why-people-are-investing-in-aurangabads-real-estate

औरंगाबादमध्ये घर खरेदीला का मिळते आहे पसंती?

मागील दोन वर्षांपासून गृहखरेदी, प्रॉपर्टीमधील गुंतवणूक व एकूणच रिअल इस्टेट क्षेत्राची विस्कटलेली घडी पूर्वपदावर येत आहे. औरंगाबाद शहरात बांधकाम क्षेत्राने पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. या दोन वर्षात गृहखरेदी, गुंतवणूक, कमर्शिअल शॉप्स खरेदीच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना आपली योजना थांबवावी लागली होती. आता नव्या उत्साहाने आपली योजना प्रत्यक्षात आणण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

गृहखरेदीचा सुवर्णयोग : रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या खरेदीदारांसाठी उत्तम संधी आहे. ग्राहकांना अपेक्षित सोयीसुविधा, आर्थिक सुलभतेसाठी आकर्षक व स्वस्त गृहकर्ज योजना, वेळेत आश्वासनपूर्ती व ताबा, व्यवहारातील पारदर्शकता, रजिस्ट्री खर्चात व मुद्रांक शुल्कात मोठी सूट यामुळे ग्राहकांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टींचा सुवर्णयोगच जुळून आला आहे.

स्वतःच्या घराचे महत्त्व : लॉकडाऊन काळातील अनुभवाने लोकांच्या मनात स्वतःचे घर असण्याचे महत्त्व आणि मूल्य बिंबवले आहे. या काळात 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना बहुतेक लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सावरताच लोकांनी पहिले प्राधान्य घर खरेदीला दिल्याचे एका सर्व्हेतून दिसून आले आहे. घरांच्या विक्रीत वेगाने वाढ होत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. प्रॉपर्टीचे विविध पर्याय, रेडी पझेशन साईट आणि स्वस्त गृहकर्ज यामुळे लोकांना घर बुक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

झपाट्याने विकसित होणारा शहरालगतचा परिसर : शहरामध्ये मालमत्ता खरेदी करणे बजेटच्या बाहेर असल्याने शहराच्या आसपास अत्याधुनिक सोयीसुविधांसह सुनियोजित विकास यामुळे अगदी बजेटमध्ये अपेक्षित प्रॉपर्टीचे अनेक पर्याय आता उपलब्ध होत आहेत. प्रशस्त घरे, अधिक स्पेस आणि जीवनाला सुखमय अनुभव देणारे प्रकल्प ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. सहज कनेक्टिव्हिटी, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आणि मार्केट यांची उपलब्धता सुकर जीवनशैली प्रदान करते.

गुंतवणुकीसाठी संधी : रिअल इस्टेटमधील गुंतवणूक हा निश्चितच फायदेशीर पर्याय असल्याने, राज्यभरातील गुंतवणूकदारांनी औरंगाबाद शहर व शहरालगत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवली आहे. पंचतारांकित शेंद्रा, वाळूज, चित्तेगाव या एमआयडीसी आणि पाण्याची मुबलक उपलब्धता आघाडीच्या कंपन्यांना आकर्षणाचे कारण ठरतात. शैक्षणिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक संधी येथे उपलब्ध आहेत.