gudhi-padwa

सुखी कुटुंबाच्या घरकुलास नयनरम्य निसर्गाची साथ... आर्च मनोरथ....!

नयनरम्य निसर्ग आणि इतिहासाचा वारसा लाभलेले औरंगाबाद शहर आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात मोठमोठ्या इमारती साकारत आहेत. शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स आणि उद्योगधंद्यांमुळे औरंगाबाद विकासाच्या दिशेने वेगाने धावत आहे. शिक्षण, नोकरी, कला, व्यवसाय, उद्योजकता या सर्वच क्षेत्रात औरंगाबाद सरस आहे. त्यामुळे या शहरात आपलेही स्वतःचे घर असावे, असे स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत असते. हे स्वप्न साकार होऊ शकते आर्च ग्रुपच्या माध्यमातून.

आर्च ग्रुपने शहरात विविध ठिकाणी अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प उभारले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. त्यातलाच एक नयनरम्य गृहप्रकल्प आहे आर्च मनोरथ. पडेगाव येथे २ बीएचके ग्राऊंड फ्लोअर फ्लॅट्स व अपार्टमेंट्स असलेला `आर्च मनोरथ` गृहप्रकल्प ही औरंगाबादकरांसाठी एक अप्रतिम भेट आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. लवकरच इथे रहिवाशांची गजबज दिसू लागेल. त्यासाठी महत्वाचे कारण म्हणजे येथून सर्वच सोयीसुविधा अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आणि हायवेलगत असलेल्या या सर्वांगसुंदर प्रकल्पात आपले घर बुक करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

आर्च ग्रुपच्या या गृहप्रकल्पाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आर्च मनोरथमधील ८० % टक्के फ्लॅट्सची बुकिंग पूर्ण झाली आहे. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या निसर्गरम्य परिसरात तुमच्या स्वप्नातील घर आर्च मनोरथमध्ये नक्कीच साकार होऊ शकते. सद्यस्थिती पाहता, पुढच्या दोन वर्षात घरांच्या किमती आणखी वाढतील, असे म्हटले जाते. त्यामुळे ही एक नामी संधीच म्हणावी लागेल. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य फायदा घ्यायला हवा.

आर्च मनोरथचा प्लस पॉइंट म्हणजे इथले सुंदर लोकेशन आणि नयनरम्य निसर्गाची साथ. औरंगाबादच्या नामवंत आर्च ग्रुपने नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करून आर्च मनोरथमध्ये सर्वच सुविधा सज्ज केल्या आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये गृहिणींना आवडेल असे सुंदर आणि ऐसपैस किचन आहे. येथे प्रवेशासाठी भव्य एन्ट्रन्स लॉबी आहे. त्यामुळे प्रशस्त जागेचा नक्कीच फायदा होईल. रहिवाशांच्या वाहनांसाठी कव्हर्ड पार्किंग देण्यात आली आहे. गृहप्रकल्पात रेनवॉटर हार्वेस्टिंग असल्याने उन्हाळ्यात पाणीप्रश्न जाणवणार नाही. येथे पॉवर बॅकअपसह दोन लिफ्ट देण्यात आल्या आहेत. आर्च मनोरथच्या कॉमन एरियामध्ये अत्याधुनिक LED लाईट्स बसवण्यात आले आहेत. आर्च मनोरथचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. बाहेरील बाजूने गुणवत्तापूर्ण प्लॅस्टरचे कामही वेगात सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना आता वेगाने पाऊले उचलावी लागतील. आजच प्रत्यक्ष भेट द्या पडेगाव भागातील आर्च ग्रुपच्या मनमोहक `आर्च मनोरथ` या गृहप्रकल्पाला.

औरंगाबाद शहरात निसर्गरम्य वातावरणात सुंदर आणि मोहक घर घ्यायचे असेल तर `आर्च मनोरथ` हा परफेक्ट पर्याय आहे. `आर्च मनोरथ`सह आमच्या इतरही नयनमनोहर गृहप्रकल्पांची माहिती घरबसल्या घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या...!