gudhi-padwa

यंदाच्या अक्षय तृतीयेला घर खरेदीचे फायदे...!

*सण अक्षय सुख-समृद्धीचा,
सुवर्णयोग गृह खरेदीचा...!*

अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवस. `आखाजी` या नावानेसुद्धा साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावांनी साजरा होतो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात, शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षयतृतीयेचे विशेष महत्व आहे.

नवीन घर खरेदी -

ग्रहांच्या शुभस्थितीमुळे अक्षय तृतीयेला प्लॉट्स, घर यांसारख्या कायमस्वरूपी मालमत्ता खरेदी करणे शुभ ठरेल. या दिवशी आपण नवीन व्यवसाय आणि कार्य सुरू करू शकता. ज्यांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठीही हा दिवस चांगला आहे. अक्षय तृतीया हा नवीन घर विकत घेण्यासाठी एक शुभ दिवस आहे. नवीन घर विकत घेतल्यामुळे जोडप्यांना आशीर्वाद मिळतो आणि 'गृहप्रवेश' सोहळा करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. वाईट विचार नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी केल्याने आपल्या घरात सकारात्मक स्पंदने येऊ शकतात आणि त्या घरात आपण समृद्ध आणि निरोगी जीवन जगू शकता, याची खात्री होते.

शुभमुहूर्तासोबतच इतरही काही गोष्टी घर खरेदीसाठी अनुकूल आहेत.

स्वस्त गृहकर्ज -

  • बँकांनी सणासुदीसाठी गृहकर्ज व्याजदर आकर्षक केले आहेत. या व्याजदर कपातीने ग्राहकांसाठी किंवा घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सध्या बाजारात गृहकर्जाचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

  • अशा अनेक बँका आहेत जिथे आकर्षक व्याजदरासह गृह कर्जे उपलब्ध आहेत. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बऱ्याच बँका ७५ ते ९० % वित्तपुरवठा करतात. आपल्या स्वप्नातील घर विकत घेणे आता विनाअडथळा शक्य आहे.

रेपो दर स्थिर -

  • RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एप्रिल महिन्यात पतधोरण जाहीर केले असून व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के जैथे थे ठेवला आहे. यावेळीही व्याजदरात वाढ झाली नसल्याने गृहखरेदीसाठी ही चांगली संधी आहे.

  • मुद्रांक शुल्कात सवलत - :

    राज्यातील महिलांनी कोणताही फ्लॅट, घर, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी केल्यास १ एप्रिल २०२१ या आर्थिक वर्षांपासून मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाईल. याचा ग्राहकांना घर खरेदीसाठी नक्कीच फायदा होईल.

  • मूल्यांकन दर स्थिर - :

    2021-22 या आर्थिक वर्षासाठी मूल्यांकन दर तक्त्यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

वरील सर्व बाबींचा आढावा घेतल्यास यंदाचा अक्षय तृतीया सण शुभमुहूर्त आणि आर्थिक बचतीमुळे घर खरेदीसाठी दुग्धशर्करा योग ठरणार आहे.