New Year New Home 2022

नवीन वर्षात घर खरेदीसाठी औरंगाबादमध्ये हे चार लोकेशन्स आहेत बेस्ट !

आपल्या हक्काचं आणि बजेटमधलं घर घेण्याची नवीन वर्ष ही उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. सद्यस्थितीत औरंगाबादच्या शिवाजीनगर, शेंद्रा, पडेगाव, क्रांती चौक या चार भांगामध्ये घर किंवा व्यवसायाची जागा खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. याचे कारणही तसेच आहे, शहरातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हे अतिशय सूक्ष्म नियोजनातून ग्राहकांच्या अपेक्षा व बजेटनुसार सर्व सोयींनीयुक्त प्रकल्प येथे साकारत आहेत. त्यामुळे नागरिकांना हक्काचे घर मिळत असून शहराच्या सौंदर्यातही भर पडत आहे.

मागील वर्षी कोरोना संकटामुळे झालेल्या आर्थिक, मानसिक नुकसानीतून सावरण्यासाठी सर्वांना तारेवरची कसरत करावी लागली. अनेकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न यामुळे लांबणीवर पडले. आता नव्या वर्षात घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. विविध रिअल इस्टेट समूह आकर्षक आणि भरघोस ऑफर्स देऊ करीत आहेत. त्यामुळे अनेकांचे घर खरेदीचे व व्यवसाय थाटण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये अनेक राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्या स्थिरावल्या असून, डीएमआयसी व ऑरिक सिटीमुळे तर या परिसराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. येथे रोजगाराच्या व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने नागरिक इकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे निवास व व्यवसायासाठीच्या जागेची मोठी गरज भासू लागली. ही गरज लक्षात घेऊन येथे विविध रिअल इस्टेट समूहांनी प्रोजेक्ट्स साकारले आहेत.

शिवाजीनगर हा शहराचा अतिशय मध्यवर्ती परिसर आहे. येथून शहरातील सर्वच महत्वाची ठिकाणे काहीशाच अंतरावर आहेत. त्यामुळे या भागाससुद्धा नागरिक राहण्यासाठी व व्यवसायासाठी पसंती देत आहेत.

पडेगाव हा परिसर वाळूज एमआयडीसी आणि औरंगाबाद शहराच्या केंद्रस्थानी आहे. औरंगाबाद लगत असल्याने या भागाससुद्धा महत्व प्राप्त झाले आहे. विविध प्रेक्षणीय स्थळे येथून ८ ते १० किमीच्या अंतरावर असल्याने प्रत्येक आठवड्याला शीण घालवण्यासाठी रिफ्रेशमेंट्सचा आनंद घेता येतो. त्यामुळे अनेक ग्राहक या लोकेशनला प्राधान्य देत आहेत.

शहराचे केंद्रस्थान क्रांती चौक म्हणजे औरंगाबादचे वैभव आहे. येथे आपलेही घर किंवा व्यवसाय असावा असे अनेकांचे स्वप्न असते. जालना रोड, औरंगपुरा, सेंट्रल बसस्टँड, रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा जोडून असल्याने हे लोकेशन सर्वच दृष्टीने खूप सोयीस्कर आहे.

वरील सर्व ठिकाणी बरेच प्रकल्प उभे राहिले आणि उभे राहत आहेत. औरंगाबादच्या टॉप बिल्डर्स आणि डेव्हलपर्सपैकी 'आर्च ग्रुप'चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. या समूहाने शहरात विविध ठिकाणी सर्वांगसुंदर कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रकल्प साकारले आहेत.

आपण नवीन वर्षात घर खरेदी करू इच्छित असाल, तर या लोकेशन्सचा अवश्य विचार करा ! आपणांस शुभेच्छा...!