gudhi-padwa-banner-arch-developers

गुढीपाडवा सण हा नवचैत्यण्याचा, शुभ मुहूर्त आपलं घर खरेदी करण्याचा.....!

गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशदायी, मंगलमय मुहूर्त आहे. अशी आख्यायिका आहे कि, ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्‍या जीवनचक्राला सुरुवात झाली आहे. वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रदेशांत गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजा होता. दक्षिण भारतात सातवाहनांच खूप मोठं राज्य होत. त्या काळात बरेचदा परकीय आक्रमण व्हायची. अश्याच आक्रमणांपैकी शकांनी सातवाहनांवर आक्रमण केलं. परंतु गौतमीपुत्र सातकर्णीनं मोठ्या पराक्रमाने इ.स. ७८ मध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी शक राजाच्या प्रभाव केला. गौतमीपुत्र सातकर्णीनं या विजयाची आठवण म्हणून शालिवाहन कालगणना सुरु केली. तेव्हा पासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली.

संत तुकारामांच्या अभांगामध्ये सुद्धा गुढीचे वर्णन बघायला मिळते.

गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ॥धृ॥
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥२॥
तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥३॥

दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. ज्या वास्तुत ब्रह्मतत्त्व बाधित झाले असेल, दूषित झाले आहे त्या वास्तूमध्ये गुढी पाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्त्व दोष काही प्रमाणात कमी होतो. या दिवशी नवीन वस्तू, नवीन घर-जमीन, प्लॉट खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात.

आपणही या शुभमुहूर्तावर औरंगाबाद परिसरात घर घेणार असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एकमेव ठिकाण आर्च डेव्हलपर्स जेथे गुणवत्ता व ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य दिल जाते. आर्च डेव्हलपर्स औरंगाबादमधील उत्कृष्ट व प्रसिद्ध डेव्हलपर्स असून हि बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य कंपनी ग्राहकांच्या प्रथम पसंतीला उतरली आहे.

आर्च डेव्हलपर्स यांच्या मनोरथ, सप्तरंग, गुलमोहर व निकुंज या सर्व सोयी सुविधापूर्ण साईट्स असून, आपल्या स्वप्नातील घर येथे उपलब्ध आहेत. साईट्स पासून शाळा, बाजार, हॉस्पिटल अगदी काही अंतरावर आहे. आपल्याला येथे परिपूर्ण नेक्स्ट जनरेशन लाइफस्टाईल सुद्धा अनुभवता येईल.

2 बीएचके फ्लॅट्स आणि शॉप्स.
साईटचा पत्ता :
प्लॉट नं. 2 बी, गट नं 107, नाशिक हाय-वे टच, औरंगाबाद.
कॉल : 7507995599

1 व 2 बीएचके रेड़ी पझेशन फ्लॅट्स व शॉप्स.
साईटचा पत्ता :
पंडित नेहरू कॉलेजसमोर, शिवाजीनगर ते N - 4 सिडको रोड, औरंगाबाद.

2 बीएचके ग्राउंड फ्लोअर फ्लॅट्स व अपार्टमेंट्स.
साईटचा पत्ता :
आर्च आंगण लगत, नाशिक हाय वे, पडेगांव, मिटमिटा.

पडेगांवसारख्या मोक्याच्या ठिकाणी 1 व 2 बीएचके फ्लॅटस.
साईटचा पत्ता :
पोलीस कॉलोनी मागे, पडेगांव, औरंगाबाद.

आपण आजच आपलं घर बुक करा आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करून आनंदाची व समृध्दीची गुढी आपल्या स्वतःच्या घरासमोर उभारा. सृष्टीरचेता ब्रम्हादेवास करुनि वंदन, घेऊयात आर्च सोबत मनासारखे सदन, आपणा सर्वांना नववर्षाभिनंदन…!