new-house-arch-developers-aurangabad

घर खरेदी करताय? मग अवश्य जाणून घ्या या गोष्टी

औरंगाबादमध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रापर्टी खरेदी करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि राज्यातील काही मेट्रो शहरांमधील घरांच्या किमतींशी या प्रापर्टी स्पर्धा करत असल्याचे दिसून येत आहे. पण तरीही औरंगाबादमध्ये स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाच स्वप्न असते. घर खरेदी ही महत्वाची गुंतवणूक असते, त्यासाठी जिथे घर खरेदी करायची आहे त्या प्रकल्पाबद्दलची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते.

घर खरेदी करित असताना महत्वाच्या गोष्टी:
  • बजेटनुसार घर शोधने :

    घराची किंमत आणि त्या सोबतच स्टँप डय़ूटी, रजिस्ट्रेशन फीज, गृह विम्याचे प्रीमियम्स आणि प्रापर्टी विमा, ईएमआय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाचाही समावेश असतो.

  • घर असलेला परिसर :

    घर खरेदी करायचा आहे आहात तो परिसर भविष्यात मुलं कुठल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाईल, तुमच ऑफिस किती दूर पडेल. हे लक्षात ठेवून घराचा परिसराचे व्यवस्थित विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

  • परिपूर्ण माहिती आणि मूल्यांकन :

    खरेदी प्रक्रिया करण्याआधी सर्वात महत्त्वाची बाब असते डेव्हलपर्स आणि त्यांचे प्रकल्प. सोबतच आर्थिक पर्याय, सुविधा याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. डेव्हलपर्सचे आधीचे प्रकल्पांचा व्यवहार, त्यांनी घराचा ताबा निश्चित वेळी दिला की नाही याचा सारासार विचार फायदेशीर ठरतो. रिअल इस्टेट कंपनी आणि डेव्हलपर्स स्वत:ची वेबसाइट्स व ब्लॉग, सोशिअल साइट्सच्या माध्यमातून स्वतःबद्दल आणि प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवीत असतात त्यामुळे घर खरेदीतील बरेच धोके कमी झाल्याचे दिसून येत आहे.

  • घर किंवा फ्लॅटचा कार्पेट एरिया :

    तुमचा फ्लॅट नेमका किती मोठा किंवा लहान असणार आहे, याविषयी तुम्हाला कल्पना येईल. कार्पेट एरिया जितका मोठा असेल तितका तुमचा फ्लॅट प्रशस्त असतो.

  • सुखसुविधांची पडताळणी :

    घर खरेदीच्या वेळी विविध माध्यमातील जाहिराती आणि ब्रोशर्समधून संभाव्य ग्राहकाला विविध सेवा आणि सुविधांची हमी दिली जाते. घराच्या एकूण किमतीत या घटकांचाही सहभाग असतो. तुम्हाला ज्या गोष्टींचे आश्वासन दिले गेले आहे त्या गोष्टी वेळोवेळी पडताळणे गरजेचे असते.

  • बांधकाम प्रगती स्तरावरील प्रकल्प :

    प्रकल्पाचे प्रगती स्तरावर असेल तर निश्चित केलेली रक्कम आणि बांधकामाचे वेळापत्रक, गृह योजना, घर ताब्यात देण्याची तारीख याविषयी जागरूक असले पाहिजे.

या काही मुलभूत बाबींकडे लक्ष दिल्यास तुमचा मनस्ताप होणार नाही आणि तुमच्या मनासारखे घर घेण्यास सोयीचे होईल. डेव्हलपर्सकडून गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देण्यात येत आहे, तरीही घर खरेदी करताना इथे सूचित केलेल्या सर्व गोष्टींची खातरजमा करूनच विश्वसनीय आणि प्रतिष्ठित ब्रँडची निवड करा. कारण प्रतिष्ठित डेव्हलपर्सनां ग्राहकांना दिलेला शब्द पाळणे महत्वपूर्ण असते आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी आश्वासनांची पूर्तता करने हे, त्यांच्या मूलतत्वांना अनुसरून असते.