New Year New Home 2022

तुम्ही कधी येताय....! नववर्षात गृहखरेदीचा योग आलाय...!

सर्वांना नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

नूतन वर्ष २०२२ आपणासाठी काय घेऊन आलंय, असा विचार अनेकदा प्रत्येकाच्या मनात येतो. बरेच जण पहिल्या सात-आठ दिवसातच संपूर्ण वर्षाचे राशिभविष्य वाचून काढतात. त्यात त्यांचे डोळे शोध घेत असतात काही विशिष्ट शब्दांचा...! कोणते असतात ते शब्द...? मोठे लाल-निळ्या रंगातील... परदेश वारीचा योग आहे, अचानक धनलाभ, मोठ्या खरेदीचा योग, नवीन घरात प्रवेश कराल... वगैरे वगैरे...! म्हणजे काय, तर कोणतेही वर्ष आपणासाठी घेऊन येत असते आशा-आकांक्षांचा खूप मोठा पसारा...! नवनव्या स्वप्नांची जाणीव...! खरे तर हा आपल्यासाठी Future Plan असतो, Ready Format मधला. आता Turn असतो आपला. पहिल्या सात-आठ दिवसात वाचलेलं सगळं काही खरं करून दाखविण्यासाठी हाताला आणि मनालाही जोड द्यावी लागते मेहनतीची, योग्य दिशेने जाणाऱ्या प्रयत्नांची.

नव्या वर्षात वाचलेलं सगळं राशिभविष्य जसंच्या तसं साकार होईल की नाही... माहीत नाही, पण नवीन वास्तूत गृहप्रवेश, गृहखरेदीचा योग नक्कीच साकारता येईल. सध्याची परिस्थितीच तशी आहे. सामान्य जनजीवन चांगले रुळले आहे. आर्थिक हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. सगळं काही सुरळीत सुरू असल्याने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण आला आहे. त्यामुळे २०२२ मध्ये आपले स्वतःच्या घराचे स्वप्न नक्कीच साकार होईल, अशी आशा सामान्य कुटुंबांच्या मनात निर्माण झाली आहे.

रिअल इस्टेट मार्केटचा आढावा घेतला तर घराची खरेदी करण्यासाठी आता चांगली संधी चालून आली आहे. बहुतेक शहरांमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प साकारले आहेत. तेथील घरांच्या किमती स्थिर आहेत. विशेष म्हणजे, या किमती सामान्य कुटुंबांच्या आवाक्यात आहेत. आपल्या औरंगाबाद शहरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे ग्राहकांनी आलेल्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आगामी काळात याच घरांच्या किमती आणखी वाढू शकतात, हा मुद्दा प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवा.

कुठलंही घर घ्यायचं तर, सर्वाधिक महत्व असतं पसंतीला. तुमच्या अटी खूप मोठ्या असू शकतात, पण महत्वाचं काय, घराचे लोकेशन, बांधकाम, मूलभूत सोयी-सुविधा, व्यवहारातील विश्वासार्हता आणि इतर अशा सर्वच दृष्टीने ते घर आपल्यासाठी किती सोयीस्कर आहे, हे आधी समजून घ्यावे. औरंगाबाद शहर आता खूप विस्तारले आहे. शहरात उंच इमारती, शिक्षणाच्या सोयी-सुविधा, पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी, डीएमआयसी कॉरिडॉर यामुळे उद्योगधंद्यांचा चांगलाच विकास झाला आहे. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या या शहरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांनी तातडीने हालचाली केल्या तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

शहरातील हजारो कुटुंबांना सुंदर घराच्या रूपाने सुखाचा निवारा आणि समृद्धीचा आसरा देणारा `आर्च डेव्हलपर्स` हा विश्वासार्ह गृहनिर्माण समूह आहे. आर्च ग्रुपने अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प साकारले आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या भागात `आर्च डेव्हलपर्स` घेऊन आले आहे, प्रशस्त फ्लॅट्स, रो-हाउसेस, एनए-४४ प्लॉट्स, शॉप्स आणि शोरूम्सने सज्ज विविध निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प. आजच भेट द्या आर्च ग्रुपच्या आर्च कंचन, आर्च कुंदन, आर्च गुलमोहर, आर्च क्रिस्टल, आर्च कुसुम, आर्च शक्तीनगर या प्रकल्पांना...! आपण सर्वांना पुन्हा एकदा Happy New Year...!

चला, तर मग साकार करा... गृहखरेदीचा योग...!
`आर्च डेव्हलपर्स`च्या मनमोहक गृहप्रकल्पांच्या माहितीसाठी कॉल करा! +91 8208799996