gudhi-padwa

घरखरेदीसाठी आता आले आहेत... सुखभरे दिन...!

एकामागून एक दिवस भराभर जात आहेत... मनातले विचार मनातच राहू नयेत, यासाठी वेगाने पाऊले उचलण्याची आज खरी गरज आहे. पाहता पाहता नवरात्रीचा उत्सव संपला. साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला विजयादशमीचा सणही उत्साहात साजरा झाला. गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये बाजार चांगलाच उसळला आहे. साधारण दिवाळीपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने येत्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. कोरोना महामारीचा प्रभाव आटोक्यात आल्याने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण आला आहे. आपलेही स्वतःचे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या औरंगाबादकरांसाठी हाच तर खरा सुवर्णकाळ आहे. गृहखरेदीच्या बाबतीत `सुखभरे दिन आये रे भैया...!` अशी स्थिती सर्वसामान्य कुटुंबांची झाली आहे. दीपावली सण तोंडावर आल्याने, यंदाची दिवाळी स्वतःच्या घरातच साजरी करण्याचा ज्यांनी निर्धार केला आहे, तो नक्कीच पूर्ण होईल. सध्या घरांच्या किमती स्थिर आहेत. रिअल इस्टेट मार्केटमध्ये नवनवीन ऑफर्स, सवलतींचा ग्राहकांवर वर्षाव सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत प्रॉपर्टी मार्केटचा आढावा घेतला तर घरखरेदीसाठी ग्राहकांकडे हीच सुवर्णसंधी चालून आली आहे, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञही म्हणतात.

औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी शहराच्या विविध भागांमध्ये सुंदर गृहप्रकल्प उभारले आहेत. घर किंवा प्रॉपर्टीच्या किमती वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांना खरेदीसाठी सर्वच प्रमुख बँकांचे अर्थसाहाय्य मिळू शकते. कमीत कमी व्याजदरावर गृहकर्जाचा प्रमुख पर्याय ग्राहकांना उपलब्ध झालेला आहे. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांचे दर आणखी कमी होण्याची वाट न पाहता, ग्राहकांनी आलेल्या संधीचा फायदा घेऊन आपले स्वप्न साकार करावे, असेही काही वास्तुशिल्पकारांचे म्हणणे आहे. बांधकाम साहित्य, मजुरीचे दर पाहता, दिवाळीनंतर घरांच्या किमती आणखी वाढतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

घराच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये ग्राहकाची निवड महत्त्वाची असते. अशा वेळी केवळ ऑफर्स, सूट आणि सवलती मिळतात म्हणून कुठल्याही घराची ग्राहकांनी केलेली खरेदी भविष्यात धोक्याची ठरू शकते. कमीत कमी दरात घर मिळावे, अशी ग्राहकाला अपेक्षा असते. पण अशा प्रसंगी घराचे लोकेशन, बांधकाम, मूलभूत सोयी-सुविधा, व्यवहारातील विश्वासार्हता आणि इतर अशा सर्वच गोष्टींचा विचार करून सर्वच अंगांनी ते घर किती चांगले आहे, हे ग्राहकांनी आधी जाणून घ्यायला हवे.

औरंगाबाद शहर आता खूप विस्तारले आहे. उद्योगधंद्यांमुळे औरंगाबादचा चांगलाच विकास झाला आहे. रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून आज औरंगाबादकडे पाहिले जाते. उच्च शिक्षणाकरिता औरंगाबाद शहराची निवड केली जाते. शिक्षण, नोकरी, कला, व्यवसाय, उद्योजकता या सर्वच क्षेत्रात औरंगाबाद सरस आहे. त्यामुळे या शहरात आपलेही स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांनी त्वरित पाऊले टाकायला हवीत. इतर सगळे काही मस्त जुळून आले आहे.

शहरातील विश्वासार्ह बिल्डर्स अँड डेव्हलपर्स `आर्च ग्रुप`ने उत्तम लोकेशनवर अनेक सर्वांगसुंदर गृहप्रकल्प उभारले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. औरंगाबाद शहर आणि आसपासच्या भागात निसर्गरम्य परिसरातील रेडी पझेशन प्रशस्त फ्लॅट्स, रो-हाउसेस नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. तसेच भविष्यकाळात मोठा परतावा देणारे फ्लॅट्स, एनए-४४ लेआऊट असलेले प्लॉट्स अशी खूप मोठी रेंज गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनो, प्रतीक्षा खूप झाली, आता उशीर करू नका...! दिवाळीच्या पूर्वसंध्येस हाती आलेली ही सुवर्णसंधी सोडू नका. आजच भेट द्या आर्च ग्रुपच्या आर्च कंचन, आर्च कुंदन, आर्च गुलमोहर, आर्च क्रिस्टल, आर्च कुसुम, आर्च शक्तीनगर या प्रकल्पांना... आणि साकार करा तुमच्या स्वप्नातील घर....!

ठरलं तर मग... यंदाची दीपावली साजरी करायची नवीन घरात...!