gudhi-padwa-banner-arch-developers

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त घर खरेदीसाठी का आहे उत्तम !

भारतीय सणांपैकी गुढीपाडवा हा एक महत्वाचा सण असून, हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात 'गुढीपाडवा सण' साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर व्यवसायाची सुरुवात, नवीन वस्तू खरेदी, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, गृहखरेदी यासाठी प्राधान्य दिले जाते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घर खरेदी म्हणजे सुख-समृद्धीसह आनंद आणि भरभराटीचे आगमन, असा विश्वास आहे.

विशेष म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून गृहखरेदीवर चांगली सवलत आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्राचे बजेट कोलमडले होते. यांमधून यंदाचा पाडवा सण आशादायी ठरणारा आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. ग्राहकांनी विशिष्ट कालावधीत नवीन प्रकल्प येण्याची वाट न पाहता, फ्लॅट, रो-हाऊस, प्लॉट्स खरेदी निवासी आणि गुंतवणूक या दोन्ही दृष्टीने चांगला पर्याय आहे.

वेळेत वितरण, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याविषयीचे आश्वासन मिळत असल्याने, खूप गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. आता सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता आल्याने ग्राहकांच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतविलेल्या पैशांना उत्तम परतावा तसेच सुरक्षितताही प्राप्त होत आहे.

आपलंही छानसं टुमदार घर असावं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्नं असतं. कुटुंबाच्या अपेक्षा, गरजा आणि बजेट या सर्व गोष्टींच्या आधारावर घरासाठी प्रयत्न सुरू असतात. अतिशय सुंदर, वेगाने विस्तारित व विकसित होणाऱ्या औरंगाबादमध्ये घर घेण्यासाठीही अनेकजण प्रयत्नशील असतात. परंतु बजेट, लोकेशन, सोयीसुविधा यांचा ताळमेळ न बसल्याने अजूनही बरेच लोक घर खरेदीच्या प्रतीक्षेतच आहेत.

औरंगाबादमधील रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वात अग्रेसर 'आर्च डेव्हलपर्स'ने लोकांच्या गरजा व अपेक्षांचा अभ्यास करून विविध उत्तमोत्तम निवासी व व्यावसायिक प्रकल्प साकारले आहेत. या प्रकल्पांची वैशिष्ट्ये म्हणजे शहरामध्ये व शहरालगत सर्व सोयीसुविधांच्या मिलापातून साकार झालेली सुंदर जीवनशैली.

आपणही या गुढीपाडव्याला घर खरेदीच्या विचारात असाल तर एकवेळ 'आर्च डेव्हलपर्स'च्या सर्वांगसुंदर प्रकल्पांना अवश्य भेट द्या !